Ad will apear here
Next
‘शेंटीमेंटलमुळे’ महाराष्ट्र होणार हसून हसून ‘मेंटल!’
प्रदीर्घ काळानंतर अशोक सराफ चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत असणार आहेत.कोल्हापूर : ‘पोस्टर बोइज’ आणि ‘पोस्टर गर्ल’ या धमाल ‘मॅड कॉमेडी’ चित्रपटांच्या माध्यमातून महाराष्ट्र गाजवल्यानंतर समीर पाटील आता ‘शेंटीमेंटल’ या नवीन चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना हसून हसून मेंटल बनवायला सज्ज झाले आहेत. सामाजिक प्रश्नांवर विनोदी शैलीत भाष्य करणारा दिग्दर्शक अशी समीर पाटील यांची ओळख झाली आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीमध्ये ‘शेंटीमेंटल’ या नवीन चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे.

आर. आर पी. कॉर्पोरेशन आणि बनी डालमिया प्रस्तुत ‘ई. सी. एम. पिक्चर्स’ निर्मित असणाऱ्या या चित्रपटाचे अजून एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी प्रसिद्ध असलेले अशोक सराफ प्रदीर्घ काळानंतर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये ‘शॉल्लिड’ क्रेझ निर्माण झाली आहे.

उपेंद्र लिमये, विकास पाटील, पल्लवी पाटील, सुयोग गोरे, रघुवीर यादव आदी कलाकारांचा समावेश असणारा हा चित्रपट येत्या २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZIQBD
Similar Posts
‘शेंटिमेंटल’चा ‘टीझर’ प्रदर्शित कोल्हापूर : ‘पोस्टर बॉइज’ आणि ‘पोस्टर गर्ल’मुळे हसता हसता ‘सेंटिमेंटल’ करणारा लेखक आणि दिग्दर्शक अशी समीर पाटील यांची ओळख झाली आहे. अशोक सराफ यांना दिलेल्या पोस्टररूपी आगळ्यावेगळ्या शुभेच्छांमुळे त्यांच्या नवीन ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. आता नुकत्याच प्रदर्शित
‘भेटली तू पुन्हा’चे मोशन पोस्टर प्रदर्शित! कोल्हापूर : काही व्यक्ती, काही जागा आपल्याला प्रथमदर्शनी क्लिक होत नाहीत पण मग कालांतराने सहवासातून आपुलकी निर्माण होते आणि मग नकळत प्रेम! पहिल्या नजरेत होणाऱ्या प्रेमापेक्षा सहवासातून उमलत जाणारं प्रेम जास्त गहिरं आणि हळवं असतं. हे साधं सरळ इक्वेशन असतं पण तरी ते भल्याभल्यांना लवकर उमगत नाही. आधी
‘डीकेटीई’ला ‘बेस्ट ट्रेनिंग अ‍ॅंड प्लेसमेंट’ पुरस्कार प्रदान इचलकरंजी : येथील वस्त्रोद्योग आणि अभियांत्रिकी तसेच व्यवस्थापनशास्त्राचे अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या ‘डीकेटीई’ संस्थेला वर्ल्ड एज्युकेशन समिटमध्ये बेस्ट प्लेसमेंट अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार ‘डीकेटीई’च्या वतीने एमबीए विभागप्रमुख प्रा. एस. आर. पाटील यांनी डॉ. रवी गुप्ता आणि कमिशनर डॉ
कमला महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण कोल्हापूर  : पन्नास कोटी वृक्ष लागवडीच्या अंमलबजावणी कार्यक्रमाचा भाग म्हणून ‘रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर’च्या सहकार्याने येथील कमला महाविद्यालयातील विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी वृक्षारोपण केले. या वेळी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, रोटरीचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language